आश्चर्यच ! हे 91 वर्षीय आजोबा दररोज करतात 8 तास शेतात काम

आजच्या तरूणाईला काम सोडून सतत मोबाईल वापरताना आपण पाहतो. काहीजण शॉर्टकट वापरून त्वरित काम संपवण्याचा प्रयत्न करतात. मात्र कर्नाटकमधील एक 91 वर्षीय आजोबा आजही 8 तास काम करतात.

कर्नाटकमधील कुलबुर्गी येथील 91 वर्षीय बसवण्णा पाटील हे शेतकरी आहेत. मात्र ते अनेक तरूणांना लाजवेल अशाप्रकारे दररोज 8 तास शेतात काम करतात.

वृत्त संस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, 91 वर्षीय बसवण्णा दररोद सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत शेतात काम करत असतात. ते एवढे तंदरुस्त कसे याविषयी विचारल्यावर बसवण्णा पाटील सांगतात की, मी दररोज चपाती, दही आणि दुध पितो. त्यामुळे मी आजारी पडत नाही.

बसवण्णा पाटील यांना 6 मुले आहेत. मात्र त्यातील एकही जण शेती करत नाही. आजच्या तरूणाईला काही संदेश देणार का ? असे विचारले असता ते म्हणाले, आजची मुलं कोणाचेच ऐकत नाही.

 

Leave a Comment