ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी असा ओळखा फेक ई-मेल

इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सध्या सायबर अटॅक आणि ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. हॅकर्स खोटे ई-मेल, मेसेज आणि वेबसाइट्सच्या मदतीने लोकांची फसवणूक करत आहेत. मार्केटमध्ये असे अनेक अप्स आहेत, ज्याद्वारे लोकांना लुबाडले जात आहे. आज आम्ही तुम्हाला फेक ई-मेल आणि साइट्सची ओळख कशी करायाची याबाबत माहिती सांगणार आहोत.

(Source)

नावावर विश्वास ठेऊ नका –

जर तुम्हाला कोणी ई-मेल करत असेल, तर त्याच्या नावावर अजिबात विश्वास ठेऊ नका. हॅकर्स तुमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या नावाने देखील फेक मेल पाठवतात. त्यामुळे सर्वात प्रथम मेल तपासा.

(Source)

स्पेलिंगमध्ये चूका-

तुम्हाला जर एखादा मेल आला तर त्यामध्ये लिहिलेला टेक्स्ट लक्षपुर्वक वाचा. कारण फेक मेलमध्ये व्याकरण आणि स्पेलिंगच्या अनेक चुका असतात.

 

यूआरएल चुकीचा –

खोट्या वेबसाइट्स बरोबरच फेक ई-मेल तपासण्यासाठी देखील एक पध्दत आहे. ई-मेलमध्ये आलेल्या कोणत्याही लिंकला खरेदी करण्यापुर्वी त्यावर माउस न्यावा. त्यानंतर तुम्हाला पॉपअपमध्ये खरा यूआरएल आणि हायपरलिंक दिसेल.

(Source)

खाजगी माहिती देऊ नका –

हॅकर्स अनेकदा तुमच्याकडे ई-मेलमध्ये खाजगी माहिती मागतात. त्यामुळे चुकूनही तुमचे नाव, पासवर्ड आणि डेबिट-क्रेडिट कार्डची माहिती देऊन नका.

(Source)

 

ई-मेलमध्ये पाठवण्यात आलेली फाईल उघडू नका –

अनेक हॅकर्स माहिती मिळवण्यासाठी फेक मेलमध्ये अटॅचमेंट अथवा लिंक पाठवतात. या परिस्थितीमध्ये ई-मेलची तपासणी करूनच अटॅचमेंट उघडावी. जर तुम्हाला मेल फेक वाटत असेल तर त्वरित डिलीट करा.

Leave a Comment