मुस्लिम डिलिव्हरी बॉय असल्यामुळे नाकारली ऑर्डर, स्विगीने केली पोलिसांकडे तक्रार

एका ग्राहकाने फूड डिलिव्हरी अॅप स्विगीद्वारे ऑर्डर करण्यात आलेले जेवण मुस्लिम युवकाकडून घेण्यास नकार दिल्याची घटना हैदराबाद येथे घडली आहे. आता पोलिस जेवण ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात कारवाई करणार आहे. या प्रकरणात स्विगीने तक्रार दाखल केली आहे. स्विगीच्या तक्रारीनुसार, त्यांच्या कर्मचारी मुदस्सिर सुलेमान जेवणाची ऑर्डर घेऊन गेल्यावर ग्राहकाने त्याला त्याचा धर्म विचारला.

डिलिव्हरी करणाऱ्या मुलाने आपण मुस्लिम असल्याचे सांगितल्यावर ग्राहकाने जेवण परत घेऊन जाण्यास सांगितले. पोलिसांनी सांगितले की, लवकरच त्या व्यक्तीच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात येईल.

https://twitter.com/amjedmbt/status/1186986870862794752

या प्रकरणावर मजलिस बचाओ तहरीकचे अध्यक्ष अमजद उल्ला खां यांनी ट्विट केले की, ही ऑर्डर ज्या रेस्टोरेंटला देण्यात आली होती, ते देखील मुस्लिम व्यक्तीच चालवतो. ग्राहकांने चिकन-65 ऑर्डर केले होते व हिंदू मुलाला ऑर्डर घेऊन जाण्यास सांगितले होते.

स्विगीने या प्रकरणावर स्पष्ट केले की, आम्ही आमच्या ग्राहकांप्रती आणि कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करत नाही. प्रत्येक ऑर्डर ऑटोमॅटिक पध्दतीने डिलिव्हरी करणाऱ्याकडे जाते. हे त्याच्या लोकेशन आणि उपलब्धतेवर अवलंबून असते.

Leave a Comment