आता ‘या’ तारखेला रिलीज होणार ‘बायपास रोड’


नील नितीन मुकेशच्या आगामी ‘बायपास रोड’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. १ नोव्हेंबरला प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता ८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात येणार असल्याची माहिती ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करुन दिली आहे.


या चित्रपटाचे आकर्षक नवीन पोस्टर रिलीज झाले आहे. नील नितीन मुकेश याची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नीलचा भाऊ नमन मुकेश करीत आहे. नमन मुकेशचा हा दिग्दर्शकीय पदार्पणाचा चित्रपट आहे. नील नितीन मुकेशसोबत ‘बायपास रोड’ या चित्रपटात अधा शर्मा ही अभिनेत्री काम करीत असून गुल पनाग, शमा सिकंदर, रजीत कपूर, सुधांशू पांडे, मनिष चौधरी आणि ताहेर शब्बीर यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

Leave a Comment