5 वर्षात कोट्याधीश झाला हा व्यक्ती, पाकिस्तानशी आहेत संबंध

पाच वर्षांपुर्वी मोटार बायडिंगचे काम करणारा उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथील एमएस रजावत अबरार आज कोट्याधीश आहे. पोलिसांनी तपास केल्यावर काही संशयास्पद हालचाली आणि त्याचे पाकिस्तानच्या एका धार्मिक संघटनेशी संबंध असल्याचे समोर आले आहे.

43 वर्षीय अबरार धामपूर येथील हर्रा या गावातील आहे.  चौकशीमध्ये समोर आले की, मागील 4-5 वर्षांमध्ये अबरारने कोट्यावधी संपत्ती जमवली आहे. त्याच्याकडे अनेक कोटींची बेनामी मालमत्ता आहे. एकदा तो पाकिस्तानमध्ये गेला होता. तेव्हा तेथील धार्मिस संघटन दाव ए इस्मामशी तो जोडला गेला.

पोलिसांनी सांगितले की, त्यानंतर तो वारंवार पाकिस्तानला जात होता. त्याच्या संपत्तीमध्ये देखील दुपटीने वाढ झाली. एसपी संजीव त्यागी यांनी ईडी लखनऊला अबरारची चौकशी करण्यासाठी पत्र लिहिले आहे.

पोलिसांना तपासात माहिती मिळाली की, अबरार वारंवार पाकिस्तानला जात असे. त्याच्या घरी देखील अनेक संशयास्पद व्यक्तीची ये-जा असे. या संघटनेचा भारतात प्रचार करून तो पैसे कमवत होता.

तपासणीमध्ये समोर आले की, अबरार मोटार बायडिंगद्वारे घर चालवतो. मात्र त्याने मागील काही दिवसांमध्ये विविध भागांमध्ये कोट्यावधींची संपत्ती खरेदी केली आहे. अबरार भारतात पाकिस्तानचे धार्मिक संघटन दाव ए इस्लामचा प्रसार करत होता. त्यामुळे अबरार सोबत आणखी कोण कोण जोडलेले होते, याचा तपास करण्यात येत आहे.

Leave a Comment