अमित शहांची इंस्टाग्रामवर एंट्री, केवळ दोनच लोकांना करतात फॉलो


केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची फेसबुकच्या मालकीचे फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग सोशल नेटवर्किंग अॅप इंस्टाग्रामवर एंट्री झाली आहे. शहांच्या इन्स्टाग्रामवर 513 पोस्ट असून त्यांचे 20 लाख फॉलोअर्स आहेत, तर ते केवळ दोनच लोकांनाच ते फॉली करतात. ट्विटर आणि फेसबुकवर अमित शहा खूप अ‍ॅक्टिव असतात. आता ते इन्स्टाग्रामवरही सक्रिय होतील.


त्यांनी फॉलो केलेले दोन लोक म्हणजे भाजपचे अधिकृत पृष्ठ आणि दुसरे पंतप्रधान नरेंद्र मोदी. बुधवारी अमित शहा यांच्या ट्विटर हँडल ‘ऑफिस ऑफ अमित शहा’ च्या ट्विटवर म्हटले आहे की, आता केंद्रीय गृहमंत्री, भाजप अध्यक्ष आता इन्स्टाग्रामवर देखील.

Leave a Comment