युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंचा दणदणीत विजय


मुंबई : विधानसभा निवडणुकीत युवासेना अध्यक्ष आणि शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांचा दणदणीत विजय झाला आहे. 70 हजार 191 मतांनी आदित्य ठाकरे यांचा विजय झाला आहे. आदित्य ठाकरे आणि आघाडीचे उमेदवार अॅड. सुरेश माने यांच्यात येथे प्रमुख लढत होती. तर बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमधील वादग्रस्त स्पर्धक अभिजीत बिचुकले यांनीही थेट आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात ते आले होते. दरम्यान, सुरेश माने यांना 15296 मते तर बिचुकले यांना 647 मते मिळाली आहेत.

मुंबईतील वरळी मतदारसंघाची निवडणुकीदरम्यान प्रचंड चर्चा होती. कारण, या मतदारसंघातील निवडणूक युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे लक्षवेधी ठरली. कारण ठाकरे कुटुंबातील कोणताही सदस्य 1966 मध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासून कधीही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला नव्हता. ते यानिमित्ताने निवडणूक लढवणारे ठाकरे कुटुंबातील पहिलेच सदस्य ठरले आहेत. आदित्य ठाकरे निवडणूक लढवत असल्याच्या घोषणेमुळे एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे आपला सक्षम उमेदवार आघाडीने येथे निवडणुकीच्या रिंगणात न उतरवल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे जवळपास निश्चितच झाले होते.

Leave a Comment