तब्बल सात कोटी देऊन खरेदी करण्यात आली एका कारची पार्किंग

हाँगकाँग हे जगातील सर्वात महागड्या शहरांपैकी एक आहे. या ठिकाणी राहणे, खाणे-पिणे सर्वच गोष्टी महाग आहेत. हाँगकाँगच्या महागाईचा अंदाज याच गोष्टीवरून लावला जाऊ शकतो की, या ठिकाणी एक कार पार्किंगची जागा तब्बल 1 मिलियन डॉलर (7 कोटी रूपये) मध्ये विकली गेली. ही कार पार्किंगची जागा केवळ 134 स्केअर फूट आहे. या हिशोबाने एका स्केअर फूटासाठी तब्बल 7200 डॉलर (5.10 लाख रूपये) द्यावे लागले.

रिअल इस्टेट आणि एनालिस्ट फर्म नेबरहूड एक्सनुसार, ही पार्किंग लॉजिस्टिक टायकून जॉनी चेउंगची होती. त्यांचे ऑफिस जवळच्या बिल्डिंगमध्येच 73 व्या माळ्यावर आहे. हाँगकाँगमधील जागेचे भाव हे आकाशाला भिडले आहेत.

एवढी मोठी रक्कम देऊन पार्किंग खरेदी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागील वर्षी देखील हाँगकाँगमधील एका ठिकाणी 5 कोटी रूपयांमध्ये एका कार पार्किंगसाठी जागा खरेदी करण्यात आली होती. एका पार्किंगच्या जागेसाठी येथील किंमत एका घरापेक्षाही अधिक आहे.

पार्किंगच्या बाबतीत भारताबद्दल सांगायचे तर यामध्ये मुंबईचे नाव टॉपवर आहे. मुंबईमध्ये पार्किंगच्या एक वर्गफूट जागेसाठी 1.2 लाख रूपये किंमत मोजावी लागते.

Leave a Comment