आता यूपीआयद्वारे जगभरात करा व्यवहार

परदेशात जाणारे भारतीय आता लवकरच अन्य देशांमध्ये देखील यूपीआयद्वारे व्यवहार करू शकणार आहेत. यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) काम सुरू केले आहे. पुढील सहा महिन्यात प्रयोग म्हणून संयुक्त अरब अमिरात आणि सिंगापूरमध्ये याची सुरूवात केली जाईल.

यूपीआय म्हणजे काय ?

यूपीआय म्हणजे यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस. ही एक बँक फंड ट्रांसफरची सुविधा आहे. ज्यामध्ये स्मार्टफोनवर मोबाईल नंबरद्वारे आणि व्हर्चुअल आयडीच्या मदतीने पेमेंट करता येते.

संयुक्त अरब अमिरात आणि सिंगापूरमध्ये आधीच रूपे कार्डची सुरूवात झालेली आहे. आता येथे यूपीआयद्वारे देखील व्यवहार करता येतील. त्यामुळे या देशांमध्ये जाणाऱ्या भारतीयांसाठी व्यवहार करणे अधिक सुलभ होईल.

एनपीसीआय ग्लोबल पेमेंट प्रोडक्ट बनवत आहे, ज्यामुळे यूपीआयचा अधिक वापर होईल. सप्टेंर महिन्यात यूपीआयद्वारे 95.5 कोटींचे व्यवहार झाले आहेत. फेसबूक, गुगल आणि शाओमी सारख्या ग्लोबल कंपन्यांनी देखील यूपीआय पेमेंट सिस्टममध्ये प्रवेश केला आहे.

याआधी सिंगापूर, भूटान आणि संयुक्त अरब अमिरातमध्ये रूपे कार्ड वापरण्यास सुरूवात झाली आहे.

Leave a Comment