साखरेचे प्रमाण अधिक असणाऱ्या ड्रिंक्सच्या जाहिरातींवर बंदी घालणार हा देश

साखरेचे प्रमाण अधिक असणाऱ्या पेय पदार्थांच्या जाहिरातींवर प्रतिबंध आणणारा सिंगापूर हा जगातील पहिला देश ठरला आहे. सिंगापूर सरकार साखरेचे प्रमाण अधिक असलेल्या पेयांवर बंदी घालण्याची तयारी करत आहे. मधुमेहाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. आता पेय पदार्थ बनवणाऱ्या कंपन्यांना उत्पादनांच्या लेबलवर आरोग्या संबंधी चेतावणी द्यावी लागली.

सिंगापूरमधील प्रत्येक नागरिकाच्या आहारात साखरेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सरकार अशा पेय पदार्थांच्या जाहिरातींवर बंदी आणून आजार कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. आरोग्य मंत्री एडविन टाँग यांच्यानुसार, आजारपणामुळे लोकसंख्या वृध्द होत चालली आहे. पुढील 10 वर्षात 65 वर्षांपेक्षा अधिक वयांच्या लोकांची संख्या दुप्पट होईल.

सिंगापूर आणि मलेशियामध्ये साखरेचे उपभोक्ता मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह आणि इतर आजारांचे कारण हे साखर आहे.

सरकारने साखरच्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवरील टॅक्स आणि एक्साइज ट्यूटी वाढवण्यासाठी लोकांकडून प्रतिक्रिया मागवल्या आहेत. सरकारने पेय पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण कमी करण्याविषयी कंपन्यांना सुचना दिली आहे.

Leave a Comment