सावधान ! या मेसेजवर क्लिक केल्यास एसबीआयच्या ग्राहकांचे खाते होईल रिकामे

आज पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी अनेकजण ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करतात. यामुळे वेळ देखील वाचतो व व्यवहार देखील त्वरित पार पडतात. मात्र या प्लॅटफॉर्मचा दुरूपयोग करून सायबर हॅकर्स अनेकांना गंडा घालत आहेत. देशातील ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण देखील वाढले आहे.

सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) ग्राहकांना एक मेसेज येत आहे. हा मेसेज आयकर विभागाकडून असल्याचे त्यात नमूद करण्यात येत आहे. ग्राहकांनी या मेसेजमधील लिंकवर क्लिक करताच, त्यांचे खाते रिकामे होत आहे. स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांना या बनावटी मेसेजपासून सावधान राहण्यास सांगितले आहे.

या फेक मेसेजमध्ये लिहिले आहे की, तुमचे खाते बंद झाले आहे. तुमचे अकाउंट पुन्हा सुरू करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा व केवाईसी प्रक्रिया पुर्ण करा. हॅकर्स या लिंकद्वारे ग्राहकांची खाजगी माहिती मिळवत आहेत. त्यानंतर हॅकर्स बँक खात्यातून पैसे काढतात. जर तुम्हाला देखील असा फेक मेसेज आला, तर चुकूनही त्यावर क्लिक करू नका. नाहीतर तुमचे बँक खाते देखील रिकामे होऊ शकते.

जर एसबीआयच्या ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर ते बँकेचा हेल्पलाईन नंबर 1800-111109 यावर तक्रार नोंदवू शकतात. याशिवाय भारत सरकारने देखील बँकिंग फ्राँडची माहिती देण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध केला आहे.

Leave a Comment