अरेच्चा ! केसांपासून ते घरापर्यंत या महिलेची प्रत्येक गोष्ट लाल रंगाची

प्रत्येक व्यक्तीला एखादा रंग आवडत असतो. कोणाला काळा तर कोणाला लाल, असे अनेक रंग लोकांना आवडत असतात. आपल्या आवडीच्या रंगाचे कपडे घालण्यास देखील लोकांना आवडतात. मात्र बॉस्निया येथील जोरिका रिबरनिक यांच्या सर्वच गोष्टी लाल रंगांच्या आहेत. या लाल रंगामुळे त्यांना रेड लेडी म्हणून देखील ओळखले जाते. त्यांच्या केसांपासून ते कपडे, घरातील इंटेरियरिल प्रत्येक गोष्ट लाल रंगाची आहे.

जोरिका यांना लाल रंग एवढा आवडतो की, त्यांना आपल्या आजुबाजूची प्रत्येक गोष्ट लाल बघायला आवडते. त्या लोकांच्या अंत्य संस्काराला देखील लाल रंगाची कपडे घालून जातात.

(Source)

67 वर्षीय जोरिका यांना 18 वर्षांच्या असताना लाल रंगाचा ड्रेस घालणे एवढे आवडले की, त्यांनी लाल रंग सोडलाच नाही. युरोपच्या बॉस्निया येथे राहणाऱ्या जोरिका यांच्या घरातील प्रत्येक छोटी गोष्ट लाल रंगाची आहे. त्यांची घरातील केवळ वॉटर हिटर हा दुसऱ्या रंगाचा आहे. कारण तो त्यांच्या पतीच्या सांगण्यावरून खरेदी केला आहे.

(Source)

मागील 4 दशकांपासून जोरिका एवढ्या लोकप्रिय झाल्या आहेत की, त्या स्थानिक सेलिब्रेटी झाल्या आहेत. वाढदिवसाला देखील त्यांना लाल रंग असलेल्या भेटवस्तू मिळतात.

जोरिका सांगतात की, मला लाल रंग एवढा का आवडतो माहित नाही. मी माझ्या लग्नाच्या वेळी देखील लाल रंगाचा ड्रेस घातला होता. काही दिवसांपुर्वीच जोरिकाने घरात लावलेले लाल दगड भारतातून मागवले होते.

Loading RSS Feed

Leave a Comment