एव्हरेस्टवरील कचऱ्याला रिसायकल करून बनविण्यात येत आहेत या वस्तू

प्लास्टिकमुळे पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात घातक परिणाम होत आहेत. त्यामुळे प्लास्टिकला रिसायकल करून त्यापासून अनेक नवीन गोष्टी बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टवरील कचऱ्यापासून आता विविध वस्तू बनवण्यात येत आहे. नेपाळची राजधानी काठमांडू याचबरोबर आजुबाजूच्या अनेक घरांमध्ये एव्हरेस्टचा कचरा रिसायकल्ड करून बनवण्यात आलेल्या लँप, ग्लास, दिवे आणि भांड्यांचा वापर करण्यात येत आहे.नेपाळच्या व्यावसायिकांनी आणि प्रशासनाने एव्हरेस्टवर व्यावसायिक पर्वतारोहणामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी नवीन पध्दती शोधण्यास सुरू केले आहे. एव्हरेस्टवरील शेकडो टन कचरा उचलला जात असून, यामध्ये रिकामे कॅन, बाटल्या, प्लास्टिक आणि गिर्यारोहकांच्या वस्तूंचा समावेश आहे.

स्थानिक रिसायक्लिंग संस्था ब्लू वेस्ट टू वॅल्यूचे सदस्य नवीन महारंजन यांनी सांगितले की, कचरा वाया जाऊ नये. आम्ही एव्हरेस्टवरून एल्युमिनियम, काच, प्लास्टिक आणि लोखंड उचलतो. यामधील अनेक गोष्टींची रिसायक्लिंग करता येते.

एव्हरेस्टवरील हवामान बदल चालत असल्याने नेपाळ सरकारला टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर सरकार आणि गिर्यारोहकांनी 6 आठवड्यांपर्यंत स्वच्छता अभियान चालवले. कचरा रिसायक्लड करून वस्तूंचे उत्पादन करणारी कंपनी मोवारे डिझाइन्सचे अधिकारी उजेन लेपचा यांनी सांगितले की, लोक जेव्हा या वस्तूंना बघतात तेव्हा या गोष्टी बनवणे कसे संभव आहे असा प्रश्न विचारतात.

Leave a Comment