तुम्हाला माहिती आहे का या डायनॉसोरला देण्यात आले आहे रविंद्रनाथ टागोरांचे नाव ?

रविंद्रनाथ टागोर हे नाव भारतात माहित नसेल असे मोजकेच लोक असतील. केवळ भारताचे राष्ट्रगीत लिहिले म्हणून नाही तर देशाला पहिला नोबेल पुरस्कार देखील रविंद्रनाथ टागोर यांच्या रूपातच मिळाला. थोडक्यात भारतीचा सांस्कृतिक इतिहासात टागोर यांचे नाव मोठे आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे रविंद्रनाथ टागोर यांच्या नावावरून एका डायनोसॉरचे देखील नाव ठेवण्यात आले आहे ?

सध्या सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय ठरत आहे. आयएफएस ऑफिसर प्रविण कास्वान यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले की, तुम्हाला माहिती आहे का रविंद्रनाथ टागोर यांच्या नावावर एक डायनॉसोर आहे ? यानंतर त्यांना हा बारापासॉरोस टागोरेई (Barapasaurus Tagorei) या डायनोसॉरचे नाव सांगितले. या डायनोसॉरची लांबी 18 मीटर आणि वजन 7 टन होते. 1960 च्या दशकात अदिलाबाद जिल्ह्यात या डायनॉसोरचे अवशेष सापडले होते.

अनेक युजर्सनी ही माहिती वाचून आश्चर्य व्यक्त केले तर काहींनी हे माहित नसल्याचे देखील मान्य केले.

अनेक युजर्सनी या माहितीवर आश्चर्य व्यक्त केल्यावर प्रविण कास्वान यांनी भारतातील अनेक ठिकाणी डायनोसॉरची जिवाश्म सापडल्याचे देखील सांगितले. तसेच, कोलाकात्यामध्ये डायनोसॉरच्या अवशेषांचे म्युझियम असल्याची देखील त्यांनी माहिती दिली.

 

Leave a Comment