वेब सीरिजची आवड असणाऱ्यांसाठी इंस्टाग्रामने आणले खास फीचर

फोटो शेअरिंग अॅप इंस्टाग्राम देखील आता हळहळू व्हिडीओ प्लॅटफॉर्मच्या रूपात समोर येत आहे. इंस्टाग्रामने आधीपासूनच आपल्या प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ सेक्शनसाठी आयजीटिव्ही फीचर दिलेले आहे. यामध्ये तुम्ही अधिक वेळेचे व्हिडीओ पाहू शकता. आता इंस्टाग्रामने वेब सीरिजसाठी खास फीचर आणले असून, याबाबत इंस्टाग्रामने माहिती दिली आहे.

इंस्टाग्रामच्या आयजीटिव्ही सेक्शनमध्ये आता व्हिडीओ क्रिएटर्स वेब सीरिजच्या फॉर्मेंटमध्ये व्हिडीओ बनवून अपलोड करू शकतील. विशेष म्हणजे यासाठी इंस्टाग्रामने नॉटिफिकेशन फीचर आणले आहे. जर एखाद्या क्रिएटरने यावर व्हिडीओ अपलोड केल्यास तुम्हाला युट्यूबप्रमाणेच नॉटिफिकेशन मिळेल.

इंस्टाग्राम आयजीटिव्हीवर वेब सीरिज अपलोड करण्यासाठी व्हिडीओ क्रिएटर्स स्वतःचा चॅनेल बनवू शकतात. चॅनेलवर व्हिडीओ ऑर्गेनाइज करण्याचा देखील पर्याय आहे. चॅनेलच्या नावानुसार क्रिएटर्स व्हिडीओ अपलोड करू शकतील. इंस्टाग्रामच्या चॅनेलला वेगवेगळ्या भागात विभागणी करण्यासाठी अनेक कॅटेगरी बनवण्यात आल्या आहेत.

सध्या वेब सीरिज आणि शॉर्ट व्हिडीओचा ट्रेंड वाढला आहे. त्यामुळे इंस्टाग्राम देखील अनेक फीचर्स लाँच करत आहे. असे असले तरी या नवीन फिचरमध्ये इंस्टाग्रामने रेवेन्यू शेअरिंग आणि जाहिरांतींबद्दल काहीही माहिती दिलेली नाही.

Leave a Comment