10 हजार वर्षांचे काम केवळ 200 सेंकदात करेल ही चिप, गुगलचा दावा

गुगलने एक नवीन क्वाटंम कंप्युटिंग चिप विकसित केली आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही क्वांटम चिप स्पीडच्या बाबतीत जगातील सर्वात वेगवान कॉम्प्युटरला देखील सहज मागे टाकेल. या चिपला ‘क्वांटम सुप्रीमेसी’ असे नाव देण्यात आलेले आहे. गुगलने म्हटले आहे की, जगातील सर्वात वेगवान कॉम्प्यूटर जे काम करण्यासाठी 10 हजार वर्ष घेतो, ते काम या नवीन चिपमुळे केवळ 200 सेंकदात होईल.

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ही चिप विकसित करणे मोठी कामगिरी असल्याचे म्हटले आहे. जर गुगलने केलेला दावा योग्य असेल तर यामुळे कॉम्प्युटर क्षेत्र पुर्णपणे बदलून जाईल. पॉप्युलर सायटिंफिक जर्नल ‘नेचर’मध्ये या संबंधित रिसर्च प्रकाशित झाला आहे. यामध्ये गुगलने सांगितले आहे की, त्यांनी एक नवीन 54 क्यूबिट प्रोसेसर बनवले आहे. याला ‘सायकामोर’ नाव देण्यात आलेले आहे. हे प्रोसेसर बनवण्यासाठी कंपनीचे संशोधक मागील 35 वर्षांपासून कार्य करत होते.

तर दुसरीकडे आयबीएमने गुगलचा हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. आयबीएमने म्हटले आहे की, गुगलच्या दाव्यानुसार सुपर कॉम्प्युटरला 10 हजार वर्ष लागतील हे चुकीचे आहे. सुपर कॉम्प्यूटर हा टास्क अडीच दिवसात पुर्ण करू शकतो.

Leave a Comment