स्मार्टफोनचे व्यसन सोडवण्यासाठी गुगलने आणले खास अ‍ॅप्स

आज स्मार्टफोनचा वापर प्रत्येक जण करत आहे. मात्र आपल्या प्रत्येकाला मोबाईलची एवढी सवय लागली आहे की, आपण एक क्षण देखील त्या शिवाय राहू शकत नाही. मात्र आता गुगलने मोबाईलचे हेच व्यसन सोडवण्यासाठी काही खास अ‍ॅप्स आणले आहेत. या अ‍ॅपद्वारे तुम्ही तुमच्या मोबाईलचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करू शकता. जाणून घेऊया या अ‍ॅप्सविषयी.

(source)

अनलॉक क्लॉक (Unlock Clock)

अनलॉक क्लॉक हा अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्ही मोबाईल कितीवेळा उघडला याचे आकडे दिसतील.

पोस्ट बॉक्स (Post Box)

या अ‍ॅप मोबाईल युजर्स त्यांना हवे तेव्हा मेसेजचे नॉटिफिकेशन मिळवू शकतात. वारंवार नॉटिफिकेशनमुळे आपण सतत फोन तपासत असतो. अशावेळी या अ‍ॅपमुळे तुम्ही दिवसातून एकदा अथवा चारवेळाच तुम्हाला नॉटिफिकेशन येईल अशी सेटिंग करू शकता. जर तुम्हाला इमर्जेंसीमध्ये नॉटिफिकेशन बघायचे असेल तर ते देखील तुम्ही बघू शकता.

(Source)

मॉर्फ (Morph)

या अ‍ॅपमध्ये तुम्ही वेळेप्रमाणे आणि जागेप्रमाणे तुम्हाला हवे असलेलेच अ‍ॅप तुमच्या फोनमध्ये पाहू शकता. यामध्ये तुम्ही घरी असताना तुम्हाला घरी असताना हवे असलेले अ‍ॅप्स दिसतील. तर कामावर असताना तुम्हाला जे गरजेचे अ‍ॅप्स आहेत तेच दिसतील. यामध्ये हॉलिडे ही देखील कॅटेगरी आहे.

वी फ्लिप (We Flip) –

वी फ्लिप हे असे अ‍ॅप आहे ज्यामुळे एकाच वेळी तुमच्या कुटुंबातील सदस्य, मित्र फोनपासून लांब राहू शकतील. यासाठी सर्वांना हा अ‍ॅप डाऊनलोड करावा लागेल. त्यानंतर एक ग्रुप तयार केला जाईल व ग्रुपमधील सदस्य सेशन सुरू झाल्यावर फोन वापरणार नाहीत. मात्र फोन अनलॉक केल्यावर हे सेशन संपेल.

(Source)

डिसर्ट आयलंड (Desert Island)

हे अ‍ॅप देखील थोड्याफार प्रमाणात मॉर्फ सारखेच आहे. तुम्हाला एखाद्या टास्कसाठी अथवा ठराविक दिवसासाठी ज्या अ‍ॅपची गरज आहे, त्याची तुम्ही निवड करू शकता. तुम्हाला यात केवळ सातच अ‍ॅप निवडावे लागतील. त्यानंतर तुम्ही 24 तास केवळ हेच अ‍ॅप वापरू शकता का हे चँलेज असेल.

जर इमर्जेंसी असेल तर तुम्ही इतर अ‍ॅप देखील वापरू शकता. हे अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी तुम्ही गुगल प्लेवर जाऊन Google Creative Lab सर्च करू शकता. तेथे तुम्हाला हे पाचही अ‍ॅप सापडतील.

Leave a Comment