दबंग 3 च्या ट्रेलरमध्ये झाली ही चूक, सोशल मीडियावर ट्रोल

सलमान खानच्या दबंग 3 चा ट्रेलर रिलीज झाला आहे. नेहमी प्रमाणेच सलमान या चित्रपटात आपल्या हटके स्टाईलमधील पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे. सलमान खानच्या चाहत्यांना हा ट्रेलर आवडला असला तर नेटकऱ्यांनी मात्र या ट्रेलरमधील एक चूक अचूक हेरली आहे. यामुळे सोशल मीडियावर या चित्रपटाला ट्रोल देखील करण्यात येत आहे.

दबंग 3 च्या ट्रेलरच्या अखेरला रिलीज डेटमधील इंग्लिशमध्ये लिहिलेल्या डिसेंबरची स्पेलिंग चुकली आहे. ट्विटर युजर्सनी ही चूक शोधली आणि ट्रोल करण्यास सुरूवात केली.

December महिन्याची स्पेलिंग Decemeber झाली आहे. त्यामुळे स्पेलिंगमध्ये ‘ई’ एक्स्ट्रा वापरल्याने चित्रपटाला ट्रोल केले जात आहे.

याआधीचे सलमानचे दबंग फ्रेंचाइजीमधील दोन्ही चित्रपट सूपर हीट ठरले होते. त्यामुळे हा चित्रपट देखील सूपर हीट ठरणार का हे पाहण उत्सुकतेचे ठरणार आहे.

या चित्रपटात सलमान सोबतच सोनाक्षी सिन्हाची देखील प्रमूख भूमिका आहे. यासोबत महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर देखील या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा चित्रपट प्रभूदेवाने डायरेक्ट केला असून, 20 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

Leave a Comment