हा फुटबॉलपटू करणार 500 महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सर तपासणीचा खर्च

असे म्हणतात की, दुसऱ्यांना आनंद दिल्यावर तो अधिक वाढतो. कधी कधी आपण आपल्या अनुभवावरून देखील दुसऱ्यांची मदत करतो. अमेरिकेच्या नॅशनल फुटबॉल लीगचा (एनएफएल) माजी खेळाडू डी एंजिलो विलियम्सने असेच काही केले आहे. विलियम्सने 500 पेक्षा अधिक महिलांच्या मॅमोग्राफीचा खर्च उचलला आहे. ब्रेस्ट (स्तन) कॅन्सरच्या तपासणीसाठी मॅमोग्राफी केली जाते.

विलियम्स नेहमी आपल्या केसांना गुलाबी रंग लावायचे. त्याच्यासाठी हा केवळ एक रंग नसून, एक संस्कृती होती. 2006 मध्ये विलियम्सची आई साँड्रा हिल यांचा ब्रेस्ट कॅन्सरमुळे निधन झाले. त्याच्या चारही बहिणींचा देखील याच आजारामुळे मृत्यू झाला. या सर्वांचे वय 50 पेक्षा कमी होते. आपल्या आईच्या आठवणीत विलियम्सने डी एंजिलो विलियम्स फाउंडेशनची स्थापना केली व या आजाराबद्दल जागृकता पसरवण्यास सुरूवात केली.

विलियम्सनी आधी 53 महिलांच्या मॅमोग्राफीचा खर्च उचलण्याचा विचार केला. कारण त्याची आई 53 वर्षांची होती. त्याने या प्रोजेक्टला 53 स्ट्राँग फॉर सांड्रा असे नाव दिले. मात्र आतापर्यंत विविध भागातील 500 पेक्षा अधिक महिलांचा खर्च त्याने उचलला आहे.

आता हे फाउंडेशन अमेरिकेतील सर्व 50 राज्यांमध्ये असा कार्यक्रम करणार आहेत, ज्यामुळे मोफतपणे मॅमोग्राफी करता येईल. मॅमोग्राफीनंतर पुढील उपचार करण्यासाठी देखील फाउंडेशन मदत करेल.

Leave a Comment