एन्काऊंटर स्पेशालिस्ट फेम प्रदीप शर्मा पिछाडीवर


मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरुवात झाली असून शिवसेना-भाजप (महायुती)ला या मतमोजणीत सर्वाधिक जागांवर आघाडी मिळत असल्याचे दिसत आहे. पण, असे असले तरी अनेक मतदारसंघात शिवसेना आणि भाजपच्या उमेदवार हे पिछाडीवर असल्याचे दिसत आहे.

पोलीस सेवेचा राजीनामा देत शिवसेनेत मुंबई पोलीस दलातील एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेल्या प्रदीप शर्मा यांनी प्रवेश केला. नालासोपारा मतदारसंघातून शिवसेनेने प्रदीप शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. पण मतमोजणीत आता प्रदीप शर्मा हे पिछाडीवर असल्याचे दिसत आहेत. नालासोपारा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिज ठाकूर हे आघाडीवर आहेत आणि शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा पिछाडीवर आहेत.

Leave a Comment