असा आहे होंडाच्या ‘जॅज’चा नवीन लूक, लवकरच होणार लाँच

जापानच्या टोकियोमध्ये सुरू झालेल्या टोकियो ‘मोटर शो 2019’ च्या प्री इव्हेंटमध्ये होंडाने नवीन ‘जॅज’ सादर केली आहे. कंपनी सर्वात प्रथम ही कार जापानमध्ये लाँच करणार आहे. नवीन जॅज आधीपेक्षा आकर्षित बनवण्यात आली आहे. यामध्ये अनेक नवीन फीचर्स देण्यात आलेले आहेत. या कारची अनेक देशांमध्ये ‘फिट’ नावाने देखील विक्री केली जाते.

(Source)

सध्या बाजारात असलेल्या मॉडेलच्या तुलनेत नवीन जॅजमध्ये मोठे हॅडलॅम्पस, नवीन बंपर, मोठे ग्लास हाउस आणि नवीन डिझाईनचे टेललँम्प देण्यात आले आहेत. यामध्ये स्लिपर ए पिलर्स, 2 बार ग्रिल आणि मोठे फ्रंट क्वार्टर विंडो सारख्या एलिमेंट्ससोबत अधिक कर्व डिझाईन देण्यात आले आहे. कंपनीने हे नवीन मॉडेल पांढऱ्या आणि आकाशी या दोन रंगाच्या व्हेरिएंटमध्ये सादर केले आहे. हे मॉडेल बेसिक, होम, नेस, क्रॉसस्टार आणि लक्स अशा 5 व्हेरिंएटमध्ये लाँच करण्यात येणार आहे. सर्व व्हेरिएंट्समध्ये वेगवेगळे एक्सटीरियर आणि इंटेरियर मिळेल.

(Source)

जॅजच्या या नवीन मॉडेलमध्ये टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टम देण्यात आली आहे. यामध्ये रिमोट कंट्रोल फंक्शन्स, इमर्जेंसी सपोर्ट सर्विस आणि सिक्युरिटी रश-ओवर सर्विस आणि इंटरनेट कनेक्टिविटी फीचर्स मिळतील.

(Source)

कारमध्ये नवीन डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, क्रूज कंट्रोल, सिल्वर हायलाइटसोबत 2-स्पोक स्टीयरिंग व्हीव, पुश बटन स्टार्ट आणि बॉडी स्टेबलायजिंग सारखे फीचर्स मिळतील. सेफ्टीसाठी यात 8 सोनार सिस्टम आणि फ्रंट वाइड-व्यू कॅमेऱ्यासोबत ‘होंडा सेंसिंग’ टेक्नोलॉजी देण्यात आली आहे.

Leave a Comment