हुवावेचा पी ४० प्रो ड्युअल ओएस देणारा पहिला स्मार्टफोन?


चीनी स्मार्टफोन जायंट हुवावेने स्मार्टफोन सेक्टरमध्ये सर्वप्रथम दोन ओएस असणारा फ्लॅगशिप फोन आणत असल्याचे संकेत दिले आहेत. युट्युब चॅनल TECH ZGने यासंदर्भातला व्हिडीओ अपलोड केला आहे. त्यात हा संकेत दिला गेला आहे. अमेरिकेने लादलेल्या बॅन नंतर अँड्राईड ओएस वापरण्यावर बंधने आल्याने स्वतःची हार्मनी ओएस कंपनीने लाँच केली मात्र तिचा वापर अजूनतरी कोणत्याही स्मार्टफोन मध्ये हुवावेने केलेला नाही. व्हिडीओ मध्ये २०२० मध्ये येणारा कंपनीचा स्मार्टफोन हार्मनी ओएससह असेल असे सांगतानाच हुवावे पी ४० प्रो या नावाने आणल्या जात असलेल्या या स्मार्टफोनला गुगलचे लेटेस्ट अँड्राईड १० ही मिळणार असल्याचे सूचित केले गेले आहे. असे झाले तर एकाचवेळी दोन ओएस देणारा हुवावेचा जगातला पहिला स्मार्टफोन असेल.

हुवावे फ्लॅगशिप डिव्हायसेस मध्ये नेहमीच नवीन प्रयोग करत आले आहे. एकाचवेळी दोन ओएस हा त्यातलाच प्रकार आहे. अर्थात युजर एकावेळी एकाच ओएसची निवड करू शकेल. यापूर्वी ड्युअल बूटींग अॅरेंजमेंट असलेले पीसी, लॅपटॉप, काही टॅब्लेट पाहिले गेले आहेत. मात्र स्मार्टफोन मध्ये हा प्रयोग प्रथमच होत आहे.

डिव्हाईस बूट करताना युजर ऑप्शन निवडू शकेल मात्र एकदा बूट करून सेटअप केल्यावर वारंवार त्यात बदल करता येणार नाही. हुवावेचे संस्थापक आणि सीईओ रेन जेन्ग्फे यांनी एका मुलाखतीत पूर्वीच होंगमेंग ओएसचा वापर मोठ्या प्रोडक्ट रेंज मध्ये केला जाणार असल्याचे सांगितले होते. ते म्हणाले ही ओएस राउटर, नेटवर्क स्विचेस, टॅब्लेट, संगणक, डेटा सेंटर मध्ये वापरली जाईल. ही ओएस स्मार्टफोन वरही टेस्ट केली गेली आहे. ही ओएस अँड्राईड पेक्षा वेगवान आहेच पण काही वर्षात ती आयओएसला टक्कर देईल.

Leave a Comment