अयोध्येच्या राममंदिरात बसविणार महर्षी वाल्मिकींची मूर्ती


मर्यादा पुरुषोत्तम रामाची महती रामायणाच्या माध्यमातून घरोघरी पोहोचविणारे महर्षी वाल्मिकी यांची मूर्ती अयोध्येतील राममंदिरात बसविण्यात येणार असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अलोककुमार यांनी सांगितले. दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या भारतीय बौद्ध संघाने आयोजित केलेल्या आदिकवी महर्षी वाल्मिकी जयंती संमेलनात ते बोलत होते.

अलोककुमार या वेळी म्हणाले सर्वोच्च न्यायालयात अयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून निकाल आमच्याबाजुने लागेल अशी खात्री आहे. वादग्रस्त जागी पूर्वी मंदिर होते याचे ढीगभर पुरावे न्यायालयात सादर केले गेले आहेत. महर्षी वाल्मिकी हे असाधारण तपस्वी होते आणि रामायण ही त्यांचीच जगाला दिलेली मोठी देणगी आहे. त्यामुळे त्यांची मूर्ती मुख्य मंदिर परिसरात बसविली जाईल.

सीता गरोदरपणाच्या काळात वनात गेली तेव्हा महर्षी वाल्मिकी यांच्याच आश्रमात राहिली होती. तेथेच रामाचे पुत्र लव कुश जन्मले. इतकेच नव्हे तर त्याचे लालनपालन करून त्यांना सर्व विद्यांचे ज्ञान महर्षी वाल्मिकी यांनीच दिले होते. वाल्मिकींशिवाय भारताचे अध्यात्म अपूर्ण राहील.

Leave a Comment