सोशल मीडियावर व्हायरल साराचा बिकिनी लुक


केदारनाथ या चित्रपटाद्वारे हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री सारा अली खान गेल्या काही महिन्यांपासून फारच व्यस्त होती. ‘केदारनाथ’ आणि ‘सिंबा’ हे सुपरहीट चित्रपट दिल्यानंतर इम्तियाज अली दिग्दर्शित लव आजकल 2 चित्रपटाचे चित्रीकरण साराने पूर्ण केले. ती कार्तिक आर्यनसोबत या चित्रपटात दिसणार आहे. या सगळ्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत ती सध्या श्रीलंकेत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिने सोशल मीडियावर या व्हेकेशनचे काही फोटो शेअर करताच ते व्हायरल झाले आहेत.

View this post on Instagram

Lady in Lanka 🧚🏻‍♀️🇱🇰

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on


आपल्या सुट्ट्या पूर्ण एन्जॉय करताना या फोटोंमध्ये सारा दिसत आहे. सारा श्रीलंकेला तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत गेली असली तरी तिकडे ‘Me Time’ घालवायला ती विसरत नाही. तिने नुकतेच इन्स्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो शेअर केले. ती एका फोटोमध्ये समुद्र किनारी उभी आहे तर दुसऱ्या फोटोत ती स्वीमिंग पूलमध्ये कॉफीचा आस्वाद घेताना दिसत आहे. तर स्वीमिंग पूलमधील अजून एका फोटोत ती नारळ पाणी पिताना दिसत आहे. साराने काही फोटो आपल्या इन्स्टास्टोरीमध्येही शेअर केले आहेत. तिने आपले हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘लेडी इन लंका’


सैफ अली खान आणि अमृता सिंहची साराही मुलगी आहे. कोलंबिया यूनिवर्सिटीमधून तिने शिक्षण पूर्ण केले असून साराला नेहमीच अभिनेत्री व्हायचे होते. ती कार्तिक आर्यनसोबत लव आजकल 2 चित्रपटानंतर वरुण धवनसोबत कुली नंबर 1 च्या रिमेकमध्ये दिसणार आहे.

Leave a Comment