लवकरच अंतराळातील हॉटेलमध्ये घेता येणार जेवणाचा आस्वाद

काही वर्षातच आता तुम्हाला अंतराळातील हॉटेलमध्ये जेवण करण्याची संधी मिळणार आहे. कॅलिफोर्निया येथील द गेटवे फाउंडेशन स्पेस हॉटेल सुरू करणार आहे. हे हॉटेल 2027 पर्यंत तयार होईल.

द गेटवे फाउंडेशनने या हॉटेलचे नाव वॉन ब्रॉन स्पेस स्टेशन ठेवले आहे. हे गोल आकाराचे रोटेटिंग रिंगसारखे हॉटेल असेल. यामध्ये कृत्रिम गुरूत्वाकर्षणाचा वापर करण्यात येईल. ज्यामुळे गेस्ट अगदी पृथ्वीवर चालतात त्याप्रमाणेच हॉटेलमध्ये चालू शकतील.

या हॉटेलमध्ये 100 प्रवासी राहण्याची सोय असेल. यामध्ये जीम, रेस्टोरेंट, बार, कॉन्सर्ट्स वेन्यू, सेमिनार आणि चित्रपट पाहण्याची देखील सोय असेल.

या स्पेस हॉटेलमध्ये 24 मॉड्यूल्स असतील. त्यातील काही कमर्शियल आणि सरकारच्या वापरासाठी असतील. तर काही खाजगी प्रवाशांना दिले जातील.

द गेटवे फाउंडेशनचे डिझाईन आर्किटेक्ट टीम अलटॉरे यांनी सांगितले की, 2025 पर्यंत हे हॉटेल एसेंब्लस करण्याचा आमचा पर्यंत आहे. एक सर्वसामान्य व्यक्ती अंतराळात गेला आहे, असे आजपर्यंत झाले नाही. मात्र लवकरच अंतराळ हे आपल्यासाठी पर्यटनाचे हे एक ठिकाण असेल.

Leave a Comment