काश्मिर मुद्यावर भारतीय पत्रकाराने अमेरिकन काँग्रेसची केली पोलखोल

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांमुळे काश्मिरमधील मुस्लिमाना त्रास सहन करावा लागला आहे. आजपर्यंत पाश्चिमात्य देशांनी आणि जागतिक मीडियाने देखील याकडे दृलक्ष केले असल्याचे मत वरिष्ठ पत्रकार आरती टिक्कू सिंह यांनी अमेरिकन काँग्रेसच्या सुनावणीमध्ये मांडले आहे. याचबरोबर त्यांनी ही सुनावणी पुर्वग्रहदूषित, पक्षपाती आणि भारताच्या विरोधात असून, पाकिस्तानच्या बाजूने असल्याचे देखील म्हटले.

आरती टिक्कू सिंह यांनी वॉशिंग्टन येथे यूएस हाऊस फॉरेंन अफेअर्स कमिटीमध्ये ‘ह्युमन राइट इन साउथ आशिया’ या मुद्यावर बोलत होत्या.

आरती सिंह म्हणाल्या की, पाकिस्तान सारख्या दहशवादी राष्ट्रामुळे काश्मिरमधील असंख्य मुस्लिम मारले गेले. मागील 30 वर्षांपासून पाकिस्तानच्या इस्लामिक जिहादाला आणि दहशवादाकडे जागतिक मीडियाने देखील दृलक्ष केले आहे.

यावेळी सुनावणी दरम्यान संबोधन करताना सिंह यांनी काश्मिरी पत्रकार शुजार बुखारी यांचा देखील उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, शुजार बुखारी यांना का मारण्यात आले ? कारण ते पाकिस्तानकडून पसरवण्यात येणारी हिंसा रोखण्यासाठी व मानवाधिकारांची लढाई लढत होते. बुखारी यांना काश्मिरमध्ये शांतता हवी होती म्हणून त्यांना मारण्यात आले.

 

Leave a Comment