बीसीसीआयच्या बरखास्त प्रशासकीय समितीच्या सदस्यांना मिळणार एवढे मानधन !


नवी दिल्ली : आज बीसीसीआयच्या अध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली प्रशासकिय समिती बरखास्त होईल. सध्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय आणि त्यांची सहकारी डायना एडुल्जी यांचा कार्यकाळ संपुष्टात येईल. नव्या अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताच सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या या समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येईल. 2017 मध्ये विनोद राय आणि डायना एडुल्जी यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्यासोबतचे रामचंद्र गुहा आणि विक्रम लिमये यांनी आधीच राजीनामा दिला आहे.

2017 साठी दरमहा दहा लाख रुपये, 2018 साठी दरमहा 11 लाख आणि 2019 साठी दरमहा 12 लाख रुपये प्रशासकीय समितीच्या सर्व सदस्यांना देण्यात येतील. पीटीआयशी बोलताना बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीएस नरसिम्हा यांच्याशी चर्चा केल्यानंतर याबाबत अंतिम रक्कम ठरवण्यात येईल. डायना एडुल्जी आणि विनोद राय यांना करारानुसार प्रत्येकी 3 कोटी 50 लाख रुपये मिळतील. तर विक्रम लिमये, रामचंद्र गुहा आणि रवि थोडगे यांना त्यांच्या कार्यकाळानुसार पैसे दिले जातील. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले की, विनोद राय यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय समिती बीसीसीय़आच्या नव्या पदाधिकाऱ्यांनी पदभार सांभाळताच हटवण्यात यावी.

Leave a Comment