अवघ्या 5999 रुपयात घरी घेऊन जा 32 इंच स्मार्ट टिव्ही

सॅमी इंफ्रोमॅटिक्स या भारतीय कंपनीने टफेन ग्लास असणारा स्मार्ट टिव्ही लाँच केला आहे. ही कंपनी सर्वात स्वस्त स्मार्ट टिव्ही विकण्याचा दावा करते. याआधी देखील कंपनीने अनेक स्मार्ट टिव्ही बाजारात आणले आहेत. कंपनीचा नवीन टिव्ही 32 इंच असून, तो अँड्राईडवर चालतो. या टिव्हीची किंमत 5,999 रूपये आहे.

हा टिव्ही खरेदी करण्यासाठी तुम्हाला कंपनीचे अॅप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर तेथे आधार नंबर नमूद करून तुम्ही टिव्ही खरेदी करू शकता.

सॅमी नावाच्या या स्टार्टअपचे म्हणणे आहे की, कंपनी जाहिरातींद्वारे पैसे कमवते. कारण टिव्ही सुरू करताच जाहिराती दाखवण्यात येतात.  कंपनीने सांगितले की, टिव्ही स्वस्त असल्याने टिव्हीचे पार्ट्स वेगळे करून काहीजण बाजारात विकतात. त्यामुळे आधार कार्ड गरजेचे आहे.

कंपनीने हा टिव्ही संपुर्णपणे मेड इन इंडिया असल्याचा दावा केला आहे. टिव्हीची किंमत 5,999 रूपये असली तरी जीएसटी आणि शिपिंग चार्ज एक्स्ट्रा द्यावे लागतात.

यामध्ये कंपनीने स्क्रीनसाठी टफेन ग्लासचा वापर केला आहे. याशिवाय या टिव्हीला पेन ड्राईव्ह देखील जोडता येतो. टिव्हीचा फ्रेम म्हणून देखील वापर करता येईल. कंपनी मागील दोन वर्षांपासून टिव्हीची विक्री करत आहे.

Leave a Comment