सिंधू आणि दीपिका ‘भारत की लक्ष्मी’ अभियानाच्या ब्रँड अ‍ॅम्बॅसडर

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला ‘भारताची लक्ष्मी’ अभियानाचे अ‍ॅम्बॅसडर बनवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या अभियानाचा हेतू दिवाळी सणाच्या निमित्ताने महिलांचे कार्य सर्वांसमोर आणणे हा आहे. पंतप्रधान मोदींनी महिला सशक्तीकरणासंबंधी एक व्हिडीओ देखील शेअर केला होता.

पंतप्रधान मोदींनी ट्विट केले होते की, भारताच्या महिला प्रतिभा, संकल्प, दृढता आणि समर्पणाचे प्रतिक आहे. आपल्या संस्कारांनी नेहमी महिला सशक्तीकरणाचा प्रयत्न करण्यास शिकवले आहे.

मोदींच्या या अभियानाला पी. व्ही. सिंधू आणि दीपिका पादुकोण यांनी देखील समर्थन दिले.

सिंधूने ट्विट केले की, समाज हा तेव्हाच विकसित होतो, जेव्हा महिला सशक्त असतात आणि त्यांच्या कामगिरीला गर्वाने पाहिले जाते. मी पंतप्रधान मोदींच्या भारत की लक्ष्मी अभियानाचे समर्थन करते.  हा भारताच्या महिलांच्या असाधारण कामगिरीचा आनंद साजरा करण्याचा प्रयत्न आहे. या दिवाळीला स्त्रीत्वाचा आनंद साजरा करूया.

दीपिकाने देखील या अभियानाचे समर्थन करत ट्विट केले की, यंदाच्या दिवाळीत आपल्या देशातील महिलांच्या कामगिरीवर आणि त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकू व त्याचा आनंद साजरा करूया.

Leave a Comment