संविधानाची शपथ घेत विवाहबद्ध झाले हे जोडपे

आपले लग्न एकदम हटके आणि अविस्मरणीय करण्यासाठी लोक काय काय नाही करत. कोणी थेट विमानात तर कोणी थेट पाण्याच्या आत एकमेंकाबरोबर आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन देतात. मात्र ओडिसामधील एका जोडप्याने अनोख्या पध्दतीने विवाह करत समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

ओडिसाच्या बेरहामपूर येथे राहणाऱ्या दांपत्यांच्या लग्नाला संपुर्ण शहर उपस्थित होते. बिप्लब कुमार आणि अनीता या नवविवाहित दांपत्यांनी भारतीय संविधानाची एक प्रत समोर ठेऊन एकमेंकाना पती-पत्नी म्हणून स्विकार करत असल्याची शपथ घेतली. केवळ एवढेच नाही तर या नंतर हा क्षण अविस्मरणीय करण्यासाठी दोघांनी रक्तदान शिबिराचे देखील आयोजन केले.

लग्नामध्ये आलेल्या पाहुण्यांबरोबर या दोघांनी रक्तदान केले. आपल्या लग्नाविषयी या दांपत्यांनी सांगितले की, हुंड्याच्या प्रथेपासून प्रत्येकाने वाचले पाहिजे. सर्वसाधारणपणे लग्न करणे हे पर्यावरणासाठी देखील चांगले आहे. कारण यामध्ये कोणी फटाके फोडत नाही. जोरजोरात गाणी वाजवत नाही.

औषधांच्या कंपनीत काम करणाऱ्या बिप्लब देव म्हणाले की, प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे. कारण हे आपले कर्तव्य आहे. अनिता देखील हॉस्पिटलमध्ये नर्सचे काम करते. त्यांच्या या रक्तदान शिबिरात विधवा महिलांनी देखील सहभाग घेतला .

 

 

Leave a Comment