1575 कोटी खर्च करुन बनवलेल्या ब्रिजवर कॅमेरा बसवण्यासाठी नाही पैसे


नवी दिल्ली – दिल्ली टूरिझम अँड ट्रान्सपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (डीटीटीसीसी) उत्तर-पूर्व आणि पूर्व दिल्लीला जोडण्यासाठी 1575 कोटी रुपये खर्च करून बनवलेल्या सिग्नेचर ब्रिजवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी पैसे नाही आहेत. जे बजेट होते ते ब्रिज बांधण्यावर खर्च झाले. डीटीटीडीसीने यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मदत मागितली आहे. त्याचबरोबर अशी देखील विनंती करण्यात आली आहे कि दिल्लीत 2 लाख 80 हजार कॅमेरे बसविण्याच्या योजनेसह येथे कॅमेरेही बसवावेत.

गेल्या वर्षी 4 नोव्हेंबरला सिग्नेचर ब्रिज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यानंतर यमुनापारकडे ये-जा करणाऱ्या लोकांची वाहने यावर ये-जा करत आहेत. वेग जास्त असल्याने या पुलाच्या आजूबाजूला सुमारे अर्धा डझन रस्ते अपघातही झाले आहेत. यात काही लोकांनी प्राण गमावले आहेत. या पुलावरील वेगाने जाणाऱ्या वाहनांच्या वाहतूक पोलिसांनीही काही महिन्यांपासून चालान कापले आहेत, परंतु ही मोहीम फार काळ टिकली नाही.

मागील वर्षी जेव्हा सिग्नेचर ब्रिजवर वाहतूक सुरू झाली होती. त्याच वेळी असे सांगितले गेले होते की सीसीटीव्ही कॅमेरे स्थापित केले जावेत, परंतु ते अद्याप स्थापित केलेले नाहीत. डीटीटीडीसीकडे निधी नसणे हे त्याचे कारण आहे. पुलाच्या प्रत्येक क्षेत्रावर नजर ठेवता येईल यासाठी येथे सुमारे एक डझन कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. डीटीटीडीसीने आपली समस्या दिल्ली सरकारला सांगितली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या योजनेंतर्गत येथे कॅमेरे बसवावेत अशी मागणी केली आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला एक पत्रही लिहिले आहे.

Leave a Comment