रक्तदानासाठी या पठ्ठ्याने केला चक्क 500 किमी प्रवास

एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी लोक काहीही करू शकतात. ओडिसामधील एका व्यक्तीने महिलेचे प्राण वाचवण्यासाठी तब्बल 500 किमीचा प्रवास केला आहे. महिला हॉस्पिटलमध्ये भर्ती होती व तिला रक्ताची आवश्यकता होती. त्यामुळे हा व्यक्ती 500 किमीचा प्रवास करून रक्तदान करण्यासाठी पोहचला व त्याने महिलेचे प्राण वाचवले.

सबिता या ब्रम्हपुरच्या एमकेसीजी हॉस्पिटलमध्ये भर्ती होती. महिलेने मुलीला जन्म दिला होता. सीजेरियन ऑपरेशन झाल्याने रक्त खूप कमी झाले होते.

(Source)

सर्वसाधारणपणे रक्त त्वरित मिळते. मात्र सबिता यांचा रक्तगट दुर्मिळ आहे. त्यांचा रक्तगट Bombay A+ve होता. सांगण्यात येते की, या रक्तगटाचे भारतात केवळ अडीच लाख लोकच आहेत. डॉक्टर रक्त शोधू लागले. मात्र त्यांना या गटाचे रक्त मिळाले नाही.

सबिता यांना रक्ताची गरज होती. ही माहिती सोशल मीडियाद्वारे पसरवण्यात आली. महिलेला रक्तदान करणाऱ्या दिलीप यांना ही माहिती व्हॉट्सअपद्वारे मिळाली. ते भुवनेश्वरवरून 500 किमीचा प्रवास करून महिलेला रक्तदान करण्यास पोहचले. दिलीप यांनी सांगितले की, त्यांनी लोकांना मदत केल्याने आनंद मिळतो. आतापर्यंत 4 वेळा रक्तदान केले आहे.

Leave a Comment