दंडापासून वाचण्यासाठी गाडीच्या नंबर प्लेटवर लिहिले हे नाव, पोलिस देखील झाले हैराण

अनेक वाहनचालक पार्किंग चार्ज आणि वाहतूकीच्या दंडापासून वाचण्यासाठी गाडीवर पोलिस, प्रेस आणि आमदार असे बरचं काही लिहित असतात. मात्र हैदराबादमधील एका व्यक्तीने आपल्या गाडीवर असे काही लिहिले की, जे बघून पोलिस देखील हैराण झाले.

कार मालकाने टोलचे पैसे वाचवण्यासाठी गाडीच्या नंबर प्लेटवर थेट ‘AP CM Jagan’ (आंधप्रदेश मुख्यमंत्री जगन) असे लिहिले. गाडीच्या मागील व पुढील नंबर प्लेटवर नंबरच्या ऐवजी ही अक्षरे लिहिण्यात आली होती. 19 ऑक्टोंबरला जेदीमेल्टा भागात तपासणी करत असताना पोलिसांना ही गाडी दिसली.

या कार चालकाचे नाव एम. हरी राकेश असे असून, तो आंध्र प्रदेशच्या गोदावरी येथील रहिवासी आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, टोलाचे पैसे व वाहतूक पोलिसांपासून वाचवण्यासाठी नंबर प्लेटवर सीएम जगन असे लिहिले होते.

पोलिसांनी कार जप्त केली असून, त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment