3899 रूपयांचा ‘मेड इन इंडिया’ 4जी स्मार्टफोन बाजारात दाखल

दिवाळीच्या खास मुहर्तावर भारतीय मोबाईल निर्माता कंपनी लावाने बाजारात आपला नवीन 4जी स्मार्टफोन लावा झेड41 आणला आहे. Lava Z41 हा दोन रंगाच्या व्हेरिएंटमध्ये मिळेल. रिटेल स्टोरमध्ये या फोनची विक्री सुरू झाली आहे. या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य सांगायचे तर यात 2500mAh ची बॅटरी आणि 128 जीबी पर्यंतची मेमरी आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉयड गो प्रोजेक्ट अंतर्गत बनवण्यात आला आहे.

किंमतीबद्दल सांगायचे तर लावा झेड41 ची किंमत 3899 रूपये आहे. हा फोन मिडनाइट ब्लू आणि अंबर रेड रंगात उपलब्ध आहे. या फोनसोबत जिओकडून 1200 रूपयांचा इंस्टंट कॅशबॅक ऑफर मिळत आहे. याशिवाय 50 जीबी एक्स्ट्रा डाटा देखील मिळेल.

(Source)

या स्मार्टफोनमध्ये अँड्राईड पाय 9.0 वर आधारित OS V5.0 लाइट स्कीन मिळेल. फोनचा डिस्प्ले 5 इंच असून, त्याचे रिजॉल्यूशन 480X854 पिक्सल आहे. या शिवाय फोनमध्ये 1.4GHz चा स्प्रीडट्रम SC9832E प्रोसेसर आहे, जो एक क्वॉडकोर प्रोसेसर आहे. फोनमध्ये 1 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटर्नल स्टोरेज आहे. सोबतच मेमरी कार्डच्या मदतीने स्टोरेज 126 जीबीपर्यंत वाढवता येते.

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यामध्ये एलईडी फ्लॅश लाइटसोबत 5 मेगापिक्सल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 2 मेगापिक्सल कॅमेरा आहे.

(Source)

फोनमध्ये 2500mAh ची बॅटरी आहे. यात 21 तासांचा टॉकटाइम देईल असा दावा करण्यात आला आहे. यामध्ये यूएसबी पोर्ट, वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, एफएम रेडिओ आणि 3.5 एमएमचा हेडफोन जॅक देण्यात आला आहे.

Leave a Comment