धक्कादायक ! कंटेनरमध्ये सापडले 39 मृतदेह

लंडनजवळ एका कंटेनरमध्ये 39 मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा कंटेनर बल्गेरियावरून आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मृतदेहामध्ये 38 वयस्क आणि एका तरूणाचा समावेश आहे.

या प्रकरणात एका 25 वर्षीय आरोपीला नॉर्थन आर्यलंडमधून अटक करण्यात आली असून, त्याची चौकशी सुरू आहे.

ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी देखील या घटनेवर मृतांच्या नातेवाईकांच्या प्रति सहानभूती व्यक्त केली.

पोलिस या घटनेचा तपास करत असून, हा कंटेनर बल्गेरियावरून आला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा ट्रक शनिवारी नॉर्थवेस्ट टीप ऑफ वेल्स, हॉलिवेड येथून ब्रिटनमध्ये आला असण्याची शक्यता आहे.  सांगण्यात येत आहे की, हे मानवी तस्करीचे देखील प्रकरण असू शकते.

 

 

 

 

Leave a Comment