स्टॅच्यु ऑफ युनिटीने सरकारला मिळवून दिले ५७ कोटी


गुजराथ राज्याचे पर्यटनाचे लोकप्रिय केंद्र बनलेल्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यु ऑफ युनिटीने सरकारचा तिजोरीत १० महिन्यात ५७ कोटींची भर घातली आहे. गेल्या ३१ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जगातील सर्वाधिक उंचीच्या पुतळ्याचे उद्घाटन केले होते. वर्षभराच्या अवधीत हा स्टॅच्यु ऑफ युनिटी गुजराथ राज्याचे मुख्य पर्यटनस्थळ बनला असून या काळात येथे २६ लाख पर्यटकांनी भेट दिली आहे. त्यात परदेशी पर्यटकांची संख्या मोठी आहे.


सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४३ व्या जयंतीदिनी हा १८२ मीटर उंचीचा स्टॅच्यु ऑफ युनिटी देशाला समर्पित केला गेला. या भव्य पुतळ्याच्याभोवतीच्या परिसरात म्युझियम, प्रदर्शन, लाईट आणि साउंड शो, बोटिंग, हेलीकॉप्टर राईड अश्या अनेक आकर्षक सुविधा दिल्या गेल्या आहेत. येथे जाण्यासाठी तिकीट आकारले जाते आणि त्यातूनच आत्त्तापर्यंत ५७ कोटी रुपये मिळाल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment