रोबोसाठी चेहरा द्या आणि मिळावा ९२ लाख रुपये


लंडन येथील टेक कंपनी जिओमिक ते बनवीत असलेल्या ह्युमेनॉईड रोबो साठी मानवी चेहऱ्याच्या शोधात असून निवड झालेल्या चेहऱ्याला कंपनी ९२ लाख रुपये देणार आहे. या रोबोसाठी दयाळू आणि फ्रेंडली चेहरा देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. त्यामुळे इच्छुकांच्या चेहऱ्याचे फोटो मागविले जात असून ज्या चेहऱ्याची निवड केली जाईल त्याच्याशी रीतसर करार करून त्याला ठरलेली रक्कम दिली जाणार आहे.

हुबेहूब माणूस वाटेल असा रोबो ही कंपनी तयार करत आहे. त्याचे नामकरण व्हर्च्युअल फ्रेंड असे केले गेले आहे. हे रोबो पुढच्या वर्षात तयार होत असून दरम्यान एका माणसाचा चेहरा त्यासाठी निवडला गेला आहे. या माणसाला कंपनीने ठरलेली रक्कम दिली असून त्याने ती चीन मध्ये गुंतवली असल्याचे सांगितले जात आहे. अश्या मानवी चेहऱ्याचा रोबोंची मालिकाच तयार केली जाणार असून त्यासाठी आणखी मानवी चेहरे हवे आहेत. अर्थात कोणत्याही व्यक्तीसाठी आपल्याच चेहऱ्याचे लायसेन्स अॅग्रीमेंट करण्याचा निर्णय नक्कीच मोठा आहे याची कंपनीला जाणीव आहे. मॉडेल रोबो तयार झाला की तो हुबेबुब या चेहऱ्याचा माणसासारखा दिसणार आहे आणि रोबोलाही त्यामुळे वेगळी ओळख मिळणार आहे.

गेली पाच वर्षे ही कंपनी ह्युमेनॉईड रोबोवर काम करते आहे. अर्थात रोबो साठी जो चेहरा निवडला जाईल त्याची पूर्ण माहिती कंपनी देणार आहे असे सांगितले जात आहे.

Leave a Comment