ब्रिटनमधील सर्वात मोठ्या कुटुंबात येणार नवीन पाहुणा


ब्रिटनच्या लँकशायर येथील मोरकँबे येथे वास्तव्यास असलेल्या सु आणि नोईल रेडफोर्ट यांच्या कुटुंबात नव्या पाहुण्याचे आगमन होत आहे. हे कुटुंब ब्रिटन मधील सर्वात मोठे कुटुंब असून सु आणि नोइल यांच्या २१ व्या अपत्याचा जन्म आठ महिन्यापूर्वी झाला असून आता त्यांचे २२ वे अपत्य एप्रिल मध्ये जन्मास येणार आहे. सु हिने पती नोईल सह तिच्या अल्ट्रासाऊंड तपासणीचा व्हिडीओ युट्युबवर शेअर करून नव्या पाहुण्याच्या आगमनाची खबर दिली आहे. विशेष म्हणजे सु फक्त ४४ वर्षाची आहे.


अर्थात आठ महिन्यापूर्वी जेव्हा बोनीचा जन्म झाला तेव्हा सु हिने हे त्यांचे शेवटचे अपत्य असेल असे सांगितले होते. पण प्रत्यक्षात मात्र घरात २२ वे अपत्य येऊ घातले आहे. सुचा सर्वात मोठा मुलगा क्रिस ३० वर्षाचा तर त्याच्या पाठची सोफिया २५ वर्षाची आहे. सोफिया तीन मुलांची आई झाली आहे. हे दोघे मोठे बहिण भाऊ वेगळे राहतात. सु च्या कुटुंबात ११ मुलगे आहेत. सु आणि नोईल यांचे १७ वे अपत्य जन्मताच मरण पावले होते.

सु आणि नोईलचे कुटुंब २००४ साली महिना १७० पौड भाडे असलेल्या घरात वास्तव्यास होते. नोईलचा बेकरीचा व्यवसाय आहे. सध्या ते १० बेडरूम असलेल्या घरात राहत आहेत. दर आठवड्याला या कुटुंबाला खाण्यावर ३२ हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च येतो. रोज या घरात १८ किलो वजनाचे कपडे धुतले जातात आणि घर सफाईचे काम सतत सुरु असते असेही समजते.

Leave a Comment