गाई पाळण्यासाठी सोडली चक्क १२ लाखांची नोकरी


आजच्या घडीला पैशाशिवाय कोणाचेच पान हलत नाही आणि तोच पैसा कमविण्यासाठी माणूस प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतो. पण हाच पैसा त्याच्या हाती लागला तरी त्याचे समाधान त्याला मिळते का? पण एका उच्च पदावर काम करणाऱ्या राजेशने या सगळ्यावर तोडगा काढला आहे. राजेश हा एक असा तरुण आहे ज्याने १२ लाखांची नोकरी सोडली आहे. पण ऐवढी गलेलठ्ठ पगाराची नोकरी का सोडली? चला जाणून घेऊया नेमके हे प्रकरण काय आहे.

मोठ्या कंपनीमधील उच्च पदावरची नोकरी राजेश नावाच्या एका तरुणाने सोडून दिली. त्याला महिन्याला १ लाख रुपये पगार होता. पण ही नोकरी त्याने का सोडली? याचे कारण ऐकून तुम्ही देखील अचंबित व्हाल. चांगला पगार आणि ऐशोआरामी जीवन असून देखील काही लोकांचे त्यात मन रमत नसते. मग अश्या वेळेस मनाच्या चाकोरीबाहेरचा विचार करणे सुरु होते. अश्याच मानसिक स्थितीमध्ये अडकलेल्या राजेशने अखेर मनाचा हिय्या करून हा काहीसा विचित्र निर्णय घेतला. आता तो सध्या गाई पाळत आहे. काय? ऐकून आश्चर्य वाटले ना? गाई पाळतो आहे म्हणजे राजेशच्या मनात नेमके चालू काय आहे? त्याला पुढे जाऊन करायचे काय आहे? असे एक ना अनेक प्रश्न तुमच्यासारखे आम्हालाही पडले होते आणि या प्रश्नांची उत्तरे खुद्द राजेशने दिली आहेत. चला तुम्ही ही जाणून घ्या की राजेशच्या मनात नक्की काय सुरु आहे, त्याच्याच शब्दातून!

Leave a Comment