एमएस धोनी सर्च करताय? सावधान !


तुम्ही क्रिकेटचे फॅन आहात आणि आपला माही तुमचा फेव्हरीट खेळाडू आहे तेव्हा त्याच्यासंबंधी जेवढी म्हणून माहिती मिळेल ती तुम्ही गोळा करणार यात काही चूक नाही. ही माहिती सहज मिळण्याचे ठिकाण म्हणजे इंटरनेट. त्यातही गुगल सर्च हाताशी असल्यावर माहीची अगदी लेटेस्ट न्यूज मिळणार याची खात्रीच. पण सायबर सिक्युरिटी सोल्युशन कंपनी McAFee ने याबाबत युजर्सना धोक्याचा इशारा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुगलवर सर्च होणाऱ्या सेलेब्रिटी मध्ये एमएस धोनी सर्वाधिक रिस्की असून धोनीशी संबंधित हजारो फेक लिंकमुळे त्याच्या चाहत्यांना नुकसान होऊ शकते. अर्थात यात धोनीचा काहीच दोष नही. त्याच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन अॅटॅकर्स युजर्सना निशाणा बनवीत आहेत.

सविस्तर सांगायचे तर एमएस धोनी असा गुगलवर ऑनलाईन सर्च केला तर त्याची माहिती देणाऱ्या हजारो लिंक, लेटेस्ट न्यूज आहेत. अर्थात या लिंक्सचे डिझाईन एखाद्या सापळ्याप्रमाणे केले गेले आहे. त्यांचा उद्देशच मुळी युजर्सना मॅलिशीयस वेबसाईटवर निगेटिव्ह करणे किंवा व्हायरस अॅटॅक करणे हा आहे. सायबर सिक्युरिटी एक्स्पर्टच्या मते अश्या सेलेब्रिटींची यादी मोठी आहे पण त्यात धोनी आघाडीवर आहे. या यादीत सचिन तेंडूलकर, गौतम गुलाटी, सनी लियोनि, राधिका आपटे, श्रद्धा कपूर, हरमनप्रीत कौर, पीव्ही सिंधू, क्रिस्तियानो रोनाल्डो अश्या अनेक खेळाडू, कलाकारांचा समावेश आहे.

इंटरनेट सिक्युरिटी सोल्युशन कंपनी McAFee ने अश्या टॉप टेन सेलेब्रिटीची यादी जाहीर केली आहे. कंपनीचे उपाध्यक्ष वेंकट कृष्णपूर म्हणाले, युजर्सना निशाणा बनविण्यासाठी धोनीच्या लोकप्रियतेचा फायदा उठविला जात आहे. भारतात सब्स्क्रीप्शन बेस्ड कंटेंट प्लॅटफॉर्म वेगाने वाढतो आहे. लोक मोठे स्पोर्ट्स इव्हेंट, मुव्हीज, सुपरस्टार फोटो यासाठी फ्री किंवा पायरेटेड कंटेंट शोधतात. ऑनलाइन सर्च मध्ये यात तुमचा पासवर्ड, डेटा चोरी होण्याचा धोका मोठा असतो. त्यामुळे युजर्सने अधिकृत अक्सेसला प्राधान्य दिले पाहिजे.

Leave a Comment