इतिहास भारताच्या दृष्टीकोनाने लिहिण्याची गरज – नायडू

ब्रिटिश इतिहासकारांनी इतिहासाच्या घटना स्वतःला हव्या तशा लिहिल्या आहेत. त्यांनी 1857 च्या क्रांतीला देखील स्वातंत्र्यासाठी करण्यात आलेली क्रांती म्हणून स्विकारले नाही. त्यामुळे इतिहासाला भारतीय संदर्भ आणि मुल्यांसोबत पुन्हा एकदा लिहिले पाहिजे, असे मत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले आहे. ते तामिळ स्टुडेंट्स असोसिएशनच्या विद्यार्थ्यांना संबोधित करत होते.

यावेळी नायडू यांनी इतिहास हा पुन्हा भारतीय संदर्भ आणि मुल्यांना लक्षात घेऊन लिहिला पाहिजे, असे म्हटले. ते म्हणाले की, ब्रिटिश इतिहासकारांनी 1875 ला केवळ एक शिपायांचा विद्रोह असल्याचे म्हटले आहे.

नायडू म्हणाले की, भारताच्या शोषणाशी इंग्रजांचे हित जोडलेले होते. यासाठी इतिहास त्यांचे एक महत्त्वाचे उपकरण होते. आपल्या देशात 19 हजारांपेक्षा अधिक भाषा मातृभाषा म्हणून बोलल्या जातात. आपल्याला या समृध्द भाषा जपल्या पाहिजेत. भारत हा एक समृध्द देश असून, येथील भाषांवर आपल्याला गर्व असला पाहिजे. प्रत्येक मुलाला त्याच्या मातृभाषेतच शालेय शिक्षण दिले पाहिजे. यामुळे मुलांची शिकण्याची क्षमता वाढेल आणि भाषांना संरक्षण देखील मिळेल.

याशिवाय यावेळी नायडू यांनी युवकांना आहार आणि योगाच्या बाबतीत देखील जागृक केले. त्यांनी नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या ‘फिट इंडिया मुव्हमेंट’चा संदेश पसरवण्याचे आवाहन केले.

 

Leave a Comment