हॉलिवूडच्या या प्रसिध्द गायकांसोबत बप्पी लहरी यांनी गायले गाणे

बॉलिवूडचे प्रसिध्द गायक बप्पी लहरी यांची गाणी आजही लोकांना आवडतात. गळ्यातील सोन्यामुळे तर बप्पी लहरी प्रसिध्द आहेतच. मात्र त्यांची जिम्मी, जिम्मी आणि डिस्को डान्सर यासारखी गाणी आजही लोकप्रिय आहेत. बप्पी लहरी लवकरच कमबॅक करणार आहेत व ते देखील हॉलिवूडमधील प्रसिध्द गायिका लेडी गागा आणि एकॉनसोबत. बप्पी लहरींनी सांगितले की, काही दिवसांपुर्वीच त्यांनी लेडी गागाबरोबर दोन गाणी रेकॉर्ड केली आहेत.

बप्पी लहरींना सांगितले की, दोन ड्युट गाणी लेडी गागाबरोबर गायली आहेत. लेडी गागाने इंग्लिशमध्ये तर मी हिंदीमध्ये माझ्या स्टाईलमध्ये गाणी रेकॉर्ड केली आहेत. यावर्षीच्या अखेरपर्यंत ही गाणी रिलीज होतील. याशिवाय एकॉनबरोबर देखील दोन महिन्यांपुर्वीचे गाणे रेकॉर्ड केला आहे. ते देखील लवकरच रिलीज होईल.

काही दिवसांपुर्वीच न्युयॉर्कमधील द मार्टिनेझ ब्रदर्सने ‘बप्पी’ नावाचे दोन ट्रॅक रिलीज केले होते. याशिवाय बप्पी लहरी यांनी सांगितले की, यामध्ये माझे प्रसिध्द गाणे जिम्मी, जिम्मी, जिम्मीचे रिमिक्स व्हर्जन आहे. याशिवाय 2007 मध्ये देखील ब्रिटिश-श्रीलंकन रॅपरने हे गाणे वापरले होते. त्याच्या पुढील वर्षीच ‘यू डोन्ट मेस विथ द झोहान’ या चित्रपटात हे गाणे होते.

Leave a Comment