या अनोख्या शाळेतील विद्यार्थी एकाच वेळी लिहितात दोन्ही हातांनी

आपल्या आजुबाजूचे 90 टक्के लोक ही उजव्या हाताने लिहितात. केवळ 10 टक्केच डाव्या हाताने लिहू शकतात. मात्र जगात असे प्रतिभाशाली व्यक्ती होऊन गेले जे दोन्ही हाताने लिहायचे. लियोनार्डो दा विंची, बेन फ्रँकलिन, अल्बर्ट आइंस्टीन आणि भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद ही त्यातली काही उदाहरणे आहेत. मात्र जर एखाद्या शाळेतील विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच दोन्ही हातांनी एकाच वेळी लिहिण्याची ट्रेनिंग दिली तर ? आपल्या देशात अशीच एक शाळा आहे, जेथे प्रत्येक विद्यार्थी हा दोन्ही हातांनी लिहू शकतो.

मध्य प्रदेशमधील सिंगरौली येथील बुधेला गावात वीणा वादिनी पब्लिक स्कूल आहे. या शाळेत जवळपास 200 विद्यार्थी शिकतात व प्रत्येक विद्यार्थ्याकडे दोन्ही हातांनी लिहिण्याची कला आहे. या शाळेची स्थापना 1999 मध्ये माजी सैनिक वीपी शर्मा यांनी केली होती.

वीपी शर्मा सांगतात की, शाळेत पहिल्या वर्गापासूनच विद्यार्थ्यांना दोन्ही हातांनी लिहिण्याचे ट्रेनिंग दिले जाते. जेव्हा विद्यार्थी तिसरीला जातात तेव्हा ते सहज दोन्ही हातांनी लिहू लागतात. 7 व 8 वीच्या वर्गात आल्यावर त्यांची गती व अचुकता देखील वाढलेली असते. प्रत्येक विद्यार्थी एकाचवेळी दोन्ही हातांनी दोन भाषा लिहू शकतो.

यामुळे विद्यार्थ्यांना देखील फायदा होत आहे. या शाळेत देवनागरी, उर्दु, स्पॅनिश, रोमन, इंग्रजीसह सहा भाषा शिकवल्या जातात. शाळेतील एक विद्यार्थी सरासरी एका तासाला 24 हजार शब्द लिहू शकतो. ही शाळा आठवी पर्यंतच आहे. मात्र प्रत्येक विद्यार्थ्याला 80 ते 100 पर्यंत पाढे येतात.

 

Leave a Comment