48 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह लाँच झाला हॉनरचा नवा स्मार्टफोन

हॉनरने आपला नवीन स्मार्टफोन हॉनर 20 लाइट चीनमध्ये लाँच केला आहे. या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा, किरीन 710एफ प्रोसेसर, फूल-एचडी OLED डिस्प्ले आणि 4000 एमएएचची दमदार बॅटरी आहे. यामध्ये कंपनीने इन-स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर देखील दिला आहे.

हा फोन 4 व्हेरिंएटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हॉनर 20 लाइटच्या 4 जीबी रॅम + 64 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिंटची किंमत 1399 युआन (14000 रूपये) आहे.  6 जीबी रॅम + 64 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिंएटची किंमत 1499 युआन (15,000 रुपये), 6 जीबी रॅम + 128 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिंएटची किंमत 1699 युआन (17,000 रुपये) आहे. याशिवाय 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिंएटची किंमत 1899 युआन (19,000 रुपये) आहे. मॅजिक नाइट ब्लॅक, ब्लू वॉटर जेड आणि आइसलँडिक फँन्टसी रंगामध्ये हा फोन मिळेल.

(Source)

हा फोन अँड्राइडवर 9 वर आधारित EMUI 9.1.1 वर काम करतो. यामध्ये 6.3 इंचाचा फूल एचडी+ OLED डिस्प्ले देण्यात आला असून, त्याचे रिजॉल्यूशन 1080×2400 आहे. याशिवाय यात वॉटरड्रॉप नॉच देखील देण्यात आला आहे. हा फोन किरीन 710एफ ऑक्टा-कोर प्रोसेसर कार्य करेल.

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. प्रायमेरी कॅमेरा हा 48 मेगापिक्सल असून, दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सल व तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सल आहे. सेल्फीसाठी फ्रंटला 16 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

(Source)

याशिवाय हॉनर 20 लाइट स्मार्टफोनमध्ये 4000 एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिविटीसाठी यात 3.5 एमएम ऑडिओ जॅक, वाय-फाय, ब्लूटूथ v5, जीपीएस, यूएसबी ओटीजी यासारखे फीचर्स आहेत.

Leave a Comment