दिल्ली बंद आहे सांगून कॅब ड्रायव्हरने अमेरिकन नागरिकाला घातला 90 हजारांचा गंडा

दिल्ली पोलिसांनी एका कॅब ड्रायव्हरला अमेरिकन नागरिक जॉर्ज वेनमीटरकडून 90 हजार रूपये उकळले म्हणून अटक केली आहे. जॉर्ज 18 ऑक्टोंबरला दिल्लीला आले होते. त्यानंतर त्यांनी एक कॅब भाड्याने घेतली. मात्र ड्रायव्हरने दिल्ली बंद असल्याचे सांगत त्यांची फसवणूक केली.

जॉर्ज वेनमीटर यांनी सांगितले की, विमानतळावरून माझी बुकिंग असलेल्या पहाडगंज येथील हॉटेलवर घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर आरोपी ड्रायव्हरने सणांमुळे दिल्ली बंद असून, रस्ते देखील ब्लॉक करण्यात आले असल्याचे सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, यानंतर ड्रायव्हर जॉर्जना घेऊन कनॉट प्लेस येथील खोट्या टूर एजेंसीकडे घेऊन गेला. तेथील स्टाफने देखील शहर बंद असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने पहाडगंज येथील हॉटेल देखील बंद असल्याचे सांगितले. यासाठी त्याने खोटा फोन देखील केला.

जॉर्जला त्यांच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. म्हणून त्यांनी रिक्षा केली. मात्र त्याने देखील हॉटेल बंद असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपी ड्रायव्हर्स जॉर्जला गोल मार्केट जवळील नकली टूर एंजेसीमध्ये घेऊन गेला व त्यांना जयपूर आणि आग्राच्या हॉटेलमध्ये बुकिंग करण्यास सांगितले व त्यांच्याकडून पैसे घेतले.

उपायुक्त ईश सिंघल यांनी सांगितले की, जॉर्जला या फसवणूकीची माहिती त्यांनी आग्र्यावरून दिल्लीतील हॉटेलला रिफंडसाठी कॉल केल्यावर समजली. पोलिसांनी कॅब ड्रायव्हर विरोधात तक्रार दाखल केली असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

 

Leave a Comment