या दिवशी रिलीज होणार अजय देवगणचा बहुचर्चित ‘तानाजी – द अनसंग वॉरिअर’


बॉलिवूडमध्ये बायोपिक आणि ऐतिहासिक चित्रपटांची संख्या सध्याच्या घडीला वाढतच चालली आहे. या चित्रपटांना प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे ऐतिहासिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारण्याकडे बॉलिवूड कलाकारांचाही कल पाहायला मिळतो. आता ऐतिहासिक चित्रपटाकडे बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगन यानेही आपला मोर्चा वळवला आहे. अजय देवगन तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तानाजी – द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात सैफ अली खानचीही भूमिका आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.

तानाजी – द अनसंग वॉरिअरची चर्चा बऱ्याच दिवसापासून कलाविश्वात पाहायला मिळते. या चित्रपटातून तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अजय देवगन आणि सैफची मुख्य भूमिका असल्याने प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुरता असल्यामुळे फर्स्ट लूकवरही सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या भरभरुन प्रतिक्रिया पाहायला मिळतात.


आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. तलवारीसारखीच तळपदार बुद्धी, असे कॅप्शन अजयने या फोटोवर दिले आहे.


चित्रपटातील सैफ अली खानचाही लूक लक्षवेधी आहे. या चित्रपटात तो खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. अजयने सैफसोबत असलेला चित्रपटाचा लूक १० जानेवारीला सुरू होईल युद्ध, असे कॅप्शन देऊन शेअर केला आहे.


अभिनेत्री काजोल देखील या चित्रपटात भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक ओम राऊत करत असून हा चित्रपट पुढच्या वर्षी १० जानेवारीला रिलीज होणार आहे.

Leave a Comment