सरकार या तारखेपासून लागू करणार सोशल मीडियासाठी नविन नियम

आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर सर्वचजण करतात. मात्र काहीजण या प्लॅटफॉर्मचा वापर हिंसक माहिती, देशविरोधी कंटेट पसरवण्यासाठी देखील करत आहेत. आता भारत सरकार नविन वर्षाच्या सुरूवातीला सोशल मीडियावर द्वेष पसरवणाऱ्यां विरोधात कडक पावले उचलणार आहे. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँन्ड इंफॉर्मेशनने (एमईआई) सोशल मीडिया साईट्सवरील हेट स्पीच रोखवण्यासाठी सर्वाच्च न्यायालयात एफिडेविट दाखल केले आहे. या एफिडेविटमध्ये म्हटले आहे की, सोशल मीडिया हेट स्पीचसोबतच अन्य गोष्टींवर बंदी घालण्यासाठी नियम बनविले पाहिजे. ज्यामुळे हे प्लॅटफॉर्म अधिक सुरक्षित आणि चांगले होईल.

एफिडेविटनुसार, सरकार फेसबूक, इंस्टाग्राम आणि ट्विटर सारख्या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात येणाऱ्या कंटेटबद्दल विचार करत आहे. यात पुढे म्हटले आहे की, सोशल मीडियासाठी 15 जानेवारी 2020 पासून नविन नियम घेऊन येणार आहेत व याची माहिती प्रोवाइडर्सला देखील देण्यात येईल.

मागील काही दिवसांपासून, हेट स्पीच, खोटी माहिती, देशविरोधी पोस्ट अशा अनेक गोष्टींसाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील सोशल मीडियासाठी गाइडलाइन बनवण्यासाठी सरकारला सांगितले होते.

 

Leave a Comment