या सेलेब्रिटी मतदानास मुकल्या


महाराष्ट्रात काल विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान पार पडले आणि अंदाजे ६० टक्के मतदान झाल्याचे सांगितले जात असताना राज्यातील अनेक प्रमुख उद्योजक, बॉलीवूड कलावंत मतदान करू शकले नाहीत. ज्या सेलेब्रिटीनी मतदान केले त्याचे फोटो मिडिया मध्ये आले आहेत पण ज्या अनेक बड्या हस्ती काल मतदान करू शकल्या नाहीत त्यांची यादीही मोठी आहे.


मिळालेल्या माहितीनुसार टाटा उद्योग समूहाचे रतन टाटा, टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखर, जिंदल उद्योग समूहाचे सज्जन जिंदल, रिलायंस अध्यक्ष मुकेश अंबानी, उद्योजक अनिल अंबानी यांनी मतदान केले नाही. रतन टाटांसह काही जण पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने मुंबई बाहेर होते मात्र मुकेश आणि अनिल अंबानी मुंबईत असूनही मतदान करू शकले नाहीत असे समजते.

राजकारणात एके काळी बलशाली मानले गेलेले राष्ट्रवादी काँगेसचे नेते छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांनी मतदान केले नाही. अमिताभ बच्चन यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी मतदान केले नाही मात्र त्यांच्या कुटुंबाने मतदानाचा हक्क बजावला. अनुपम खेर, कंगना रानौत, टायगर श्रॉफ, सोनम कपूर मुंबई बाहेर असल्याने मतदान करू शकले नाहीत.

Leave a Comment