इन्फोसिसच्या सीईओ, सीएफओवर गंभीर आरोप

इन्फोसिसचे सीईओ सलिल पारिख आणि सीईओ नीलांजन रॉय यांच्यावर कर्मचाऱ्यांच्या एक ग्रुपने आरोप केला आहे की, कंपनीला जास्त नफा झाल्याचे दाखवण्यासाठी गुंतवणूक धोरण व अकाउंटिगमध्ये छेडछाड केली आहे. या ग्रुपचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे या संबंधित ई-मेल आणि वॉईस रेकॉर्डिंगचे पुरावे आहेत.

‘एथिकल एम्प्लॉइज’ नावाच्या इन्फोसिसच्या एका अज्ञात कर्मचाऱ्यांच्या समुहाने इन्फोसिस बोर्डासोबतच अमेरिकेच्या सिक्युरिटी अँन्ड स्टॉक एक्सचेंजला देखील पत्र लिहित आरोप केले आहेत की, कंपनीने अतिरिक्त नफा आणि रेवेन्यू मिळवण्यासाठी अनैतिक पध्दतीचा वापर केला आहे. हे पत्र 22 सप्टेंबरला लिहिण्यात आले आहे.

इन्फोसिस बोर्डाला लिहिण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, त्यांनी पुरावे मेलसोबत जोडले असून, या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी.

पत्रात आरोप करण्यात आला आहे की, कंपनीचे सीईओ सलिल पारेख यांनी दोन मोठ्या करारमध्ये समिक्षा रिपोर्टकडे दुर्लक्ष केले. याशिवाय ऑडिटर आणि बोर्डांकडून आलेल्या सूचना देखील लपवल्या. याशिवाय यात म्हटले आहे की, मार्जिन दाखवण्यासाठी चुकीचा अंदाज सादर करावा व त्यांना मोठ्या करारामधील प्रेझेंटशन सादर करण्यापासून देखील रोखण्यात आले.

इन्फोसिसचे सीएफओ नीलांजन रॉय यांच्यावर देखील आरोप आहेत की, त्यांनी बोर्ड आणि ऑडिटरची परवानगी घेतल्याशिवाय गुंतवणूक धोरण आणि अकाउंटिगमध्ये बदल केले. जेणेकरून कमी काळात कंपनीचा जास्त नफा झाल्याचे दाखवण्यात येईल.

कंपनीने म्हटले आहे की, ही तक्रार ऑडिट कमिटी समोर ठेवण्यात आली असून, याची चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल.

 

Leave a Comment