5000 mAh ची दमदार बॅटरी असणारा व्हिवोचा स्मार्टफोन लाँच

चीनी स्मार्टफोन कंपनी व्हिवोने यू सीरिजमधील यू3 (Vivo U3) हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. याफोनमध्ये5,000 एमएएचची बॅटरी, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि दमदार प्रोसेसर मिळेल.

हा फोन 2 व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आलेला आहे. 4 जीबी रॅम + 64 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 999 युआन (10 हजार रूपये) आहे. तर . 6 जीबी रॅम + 64 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,199 युआन (12 हजार रूपये) आहे.

(Source)

हा फोन स्पेर ब्लू, ब्लॅक आणि ऑनियन ब्लू रंगांमध्ये खरेदी करता येईल. भारतात हा फोन कधी लाँच होणार आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

व्हिवो यू3 या स्मार्टफोनमध्ये अँड्राईड 9 पाय आणि फनटच ओएस 9 मिळेल. याशिवाय यात 6.53 इंचचा फूल एचडी डिस्प्ले देण्यात आला असून, त्याचे रिजॉल्यूशन 1080X2340 पिक्सल आहे. चांगल्या परफॉर्मेंससाठी फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 675 प्रोसेसर देण्यात आला आहे.

(Source)

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यामध्ये 16 मेगापिक्सल प्रायमेरी कॅमेरी, 8 मेगापिक्सल वाइड एंगल लेंस आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर कॅमेरा मिळेल. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा फोनमध्ये देण्यात आला आहे.

कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये  वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस आणि यूएसबी पोर्ट टाइप-सी सारखे फीचर्स मिळतील. या फोनमध्ये 5,000 एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. जी 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत येईल.

Leave a Comment